“सान्न”ला दाद!

आमच्या एका मित्राची नात अगदी लहानपणापासूनच इंग्रजीत लिखाण करीत आली आहे. ती कथा लिहिते, कविताही करते. तिचे साहित्य तिच्या ब्लॉगवर उपलब्ध असते. जरूर वाचा.

साधारण वर्षापूर्वी तिच्या दोन कविता आमच्या मित्रमंडळाच्या वॉट्सॅप गटावर फिरल्या होत्या. मला त्या दोन्हीही कविता आवडल्या होत्या. इतक्या, की यथावकाश दोनही कवितांचा मी मराठी अनुवाद केला. अनुकरण वा नक्कल ही सर्वोत्तम दाद मानतात. त्याच न्यायाने ही माझी “सान्न”ला दाद समजावी!

I walk down the streets, and a shadow lurks behind
I fear it to be a man, with a filthy mind

A man who might attack once, leaving me with a lifetime of scars
However it may take more than a lifetime, to have that man behind bars

If I wear something too short, I am faced with taunts,
But no matter the length of my clothes, a constant fear haunts

A fear that increases, with every step I take,
My thoughts plead to the man behind, “Don’t hurt me, for God’s sake”

-Sann

रस्त्यावरून जाता जाता, मागे आली सावली ।
त्याच्या मनी काय पाप, भीती मनी दाटली ॥१॥

करेल एकदाच हल्ला, देइल जन्मभराची जख्म ।
त्याला शिक्षा होता होता, घेइन पुढचा जन्म ॥२॥

आखूड कपडे घातल्यावर, टोमणे ऐकू येती ।
कशीही असोत वस्त्रे मला, सदैव वाटे भीती ॥३॥

चालता चालता भीती दाटे, पावला-पावला गणिक ।
मनात त्याला विनवित असते, “सोड मला बरीक” ॥४॥

-मूळ कवयित्री सान्न        अनुवादक: विश्वास द. मुंडले

२५ ऑक्टोबर २०२१

Who must I blame, for the distress I face
not just me in fact, its every girl’s case

No matter the age size colour, clothes caste or time of day
what might happen to a female, one can never say

She can trust no one at all, for she faces dangers unknown,
even though she wants to, she is scared to step out alone

Harsh though it may seem, this is the bitter reality,
These crimes won’t stop, unless we develop as a society

Another breath, another soul hurt, another life gone, another body burnt
With shame must the guilty choke, because it’s not one, but another million hearts that broke.

-Sann

कुणास द्यावा दोष ना कळे, संततच्या या पीडेचा ।
केवळ माझी नसे पिडा ही, भोगच सगळ्या स्त्रीजातीचा ॥१॥

वर्ण, जात, वय, वस्त्रे किंवा, काळवेळ हो कुठलीही ।
स्त्रीच्या नशिबी काय वाढले, नच कळते ब्रह्म्यालाही ॥२॥

विश्वासावे कसे कुणावर, संकट येते कुठूनही ।
कधी वाटले मुक्त फिरावे, जाण्या धीर न होई ॥३॥

कडूजहर या सत्यापासुन, एकच होई बोध ।
समाज उन्नयनाविण कैसे, थांबावे अपराध? ॥४॥

क्षणोक्षणि पहा कुणी दुखावे, कुणी मरे अन् कुणी जळे ।
अपराध्यांनो शरमून मरा, तुम्ही दुखविले जग सगळे ॥५॥

– मूळ कवयित्री सान्न       अनुवादक: विश्वास द. मुंडले

२५ ऑक्टोबर २०२१

जाता जाता: दोन्हीही कविता परस्परांशी निगडित आहेत. म्हणूनच की काय, या कवयित्रीने तिच्या वेबसाइटवर दोन्ही कविता एकत्र मांडल्या आहेत.

Featured image credit to Flickr.com

Hits: 30

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *