Name of this website is created out of my initials, as it is meant to satisfy my need to express - in my “mother tongue” Marathi and “Other tongue” English. You will find what I wrote, translated, or enjoyed reading - very little fiction, and a lot of non-fiction. A list of tag words is available for readers to search what they need. A glossary of terminologies, especially the new and unusual, will also evolve here along with the website. Happy reading !
या जालस्थलाचे नाव माझ्या नावाच्या आद्याक्षरांपासून घडवलेले आहे, कारण त्याने भागणार आहे माझी प्रकटीकरणाची गरज – मातृभाषा मराठीतून व गुरुभाषा इंग्रजीतून. मी लिहिलेले, भाषांतरलेले किंवा मला आवडलेले लिखाण इथे सापडेल – फार थोड्या काल्पनिका, आणि बहुअंशी वास्तविका. प्रत्येक लेखाशी निगडित सूचकशब्दांचा संग्रहही वाचकांना उपलब्ध असेल. त्यावरून वाचक हवे ते शोधू शकतील. लिखाणात वापरलेल्या पारिभाषिक शब्दांचा, विशेषतः नवीन वा अपरिचित शब्दांचा, शब्दसंग्रहही इथेच उपलब्ध होत जावा असा प्रयत्न असेल.वाचनानंदासाठी शुभेच्छा!