माझा चिमणोबा

मोठ्यांनी लहानांना म्हणून दाखवावी अशी अनेक गाणी  आईने लिहिली. त्यापैकी काही निवडक इथे दिली आहेत.

माझा चिमणोबा

आजी आजोबांनी नातवंडासाठी म्हणायचे गाणे
(चाल – आवडती भारी मला माझे आजोबा)

आवडतो भारी मला । माझा चिमणोबा ॥धृ.॥

नाक त्याचे इवलेसे । गाल पुरी फुगलेसे ॥

पापा घेता म्हणे नको । माझा चिमणोबा ॥१॥

राग लोभ नयनात । खळबळ जी मनात ॥

सारा भाव दाखवीत । माझा चिमणोबा ॥२॥

गोड गोड तो बोलतो । नकला करुनी दाखवीतो ॥

सार्‍यांना तो मोहवीतो । माझा चिमणोबा ॥३॥

  • मंगला द. मुंडले

ताईंची शाळा

बर्‍याच बालमंदिरात शिक्षिकांना ताई म्हणतात. अशा बालमंदिरात जाणार्‍या मुलांसाठी गाणे

(चाल: मामाच्या गावाला जाऊया )

रस्त्यात बघून चालूया । ताईंच्या शाळेला जाऊया ॥ धृ.॥

आईच्या धरुनी हाताला । जातो आपण शाळेला ।

तिथे मिळतसे खेळाया । ताईंच्या शाळेला जाऊया ॥१॥

पाणि मिळतसे भरायला । तसेच देती दळायला ।

कागद मिळती कापाया । ताईंच्या शाळेला जाऊया ॥२॥

गाणीं दाविति गाऊन । घेति अक्षरे वाचून ।

अंक शिकविती मोजाया । ताईंच्या शाळेला जाऊया ॥३॥

खाऊ देती शनिवारी । गोळी बिस्किट हातावरी ।

घरी आणतो दाखवाया । ताईंच्या शाळेला जाऊया ॥४॥

खेळ इथे भातुकलीचा । बेत शिरा-पुरि-भाजीचा ।

अंगत पंगत करुनीया । ताईंच्या शाळेला जाऊया ॥५॥

सुट्टी ताईंच्या शाळेला । चैन पडेना आम्हाला ।

बसतो दिंडित जाउनिया । ताईंच्या शाळेला जाऊया ॥६॥

  • मंगला द. मुंडले

शाळेत जाणार्‍या मुलाला सकाळी म्हणायचे गाणे

उठ रे उठ मुला (९/२/१९९०) (चाल: मामाच्या गावाला जाऊया )

उठ रे उठ मुला लवकर ।

शाळेला होतोय उशीर ॥धृ॥

शाळा सकाळी साताची । आवड तुला रे भाताची । गरम भात कसा जेवणार ॥१॥

आवड इस्त्रीच्या कपड्यांची । वृत्ती तुझी सैनिकाची । होणार खरा तू बालवीर ॥२॥

जाता जाता शाळेला । मित्र भेटतिल वाटेला । पाय उचला भरभर ॥३॥

अक्षर गिरविसि हाताने । अंक मोजसी बोटाने । बाई म्हणती लवकर ॥४॥

वागव सकला प्रेमाने । बंधुभाव ही ठेव मनी । उडतिल कौतुक-तुषार ॥५॥

  • मंगला द. मुंडले

Hits: 28

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *