बालगीतः दळणाचे, मोटेचे
दळणाचे गाणे पूर्वी घराघरांतून दिसणारे जाते, किंवा उखळ/ मुसळ आजच्या यंत्रयुगात दिसेनासे झाले आहे, आणि त्याच बरोबर दळण कांडण या...
या सदराच्या बालगीते या उपसदरात बालांसाठी बडबडगाणी, गंमतगाणी, कविता अशी बालांनी किंवा बालांसाठी मोठ्यांनी गावी अशी गीते आढळतील. गंमतशीर प्राणिगीते, शब्दसंग्रह जोपासणारी शाब्दिक कोडी, आकड्यांची आणि पाढ्यांची गाणी असलेल्या गणितगीतांचीही उपसदरे केली आहेत. परंपरेला अनुसरून आईने आपली प्रतिभा, ओव्या, मंगलाष्टके, विहिणी, डोहाळे आणि पाळणे या सारख्या आजच्या पिढीला अपरिचित स्त्रीगीतरचनांसाठी वापरली, तीही एकत्र दिसतील. आरत्या स्तोत्रे अशा भक्तिपर रचनाही आहेत. आईने महत्वपूर्ण घरगुती घटना किंवा समारंभ साजरे करण्यासाठीही संस्कारवर्धक गाणीही रचली. गंमत म्हणून गेय विडंबनेही केली. त्यातील निवडक उदाहरणे कविता या उपसदरात दिली आहेत
Recent Comments