कोडी – स्थल काल

रचयित्री – मंगला द. मुंडले

शब्द एक अक्षरे तीन । सणात माझा मोठा मान ॥
पहिले दुसरे अक्षर घ्यावे । दशक असेही त्यास म्हणावे ॥
दुसरे पहिले तिसरे वाचा । मी कपडा एका माणसाचा ॥

उत्तर दसरा

———————————————————————–

तीन अक्षरी मी । पाण्याचा साठा ॥
माझ्या विना शोभा नाही । धरणीच्या काठा ॥
पहिल्या दोन अक्षरात । लाकूड सुतार कामाचे ॥
पहिले तिसरे घेता । कालवण होइल भाताचे ॥

उत्तर सागर

—————————————–

मी आहे एक देश । माझी अक्षरे तीन ॥
पहिल्याचा काना काढाल । तर मुलाचे नाव होईन ॥
पहिले दुसरे घ्याल तर । त्याचा अर्थ वजन ॥
पहिले तिसरे घेता घेता । मी एक अन्न ॥

उत्तर भारत

————————————————-

चार अक्षरी शब्द जाणा । शोधायाला लागेल महिना ॥
पहिले दुसरे अक्षर घेता । तुम्हा दिसू लागेल रस्ता ॥
डोके ऐसा होतो अर्थ ।
घेता अक्षर तिसरं चौथं ॥
पहिले तिसरे अक्षर घेता । होतो छोटा प्राणी ॥
असाल जर हुषार । काढा नाव शोधुनी ॥

उत्तर मार्गशीर्ष

—————————————–

एक गाव । मी तीन अक्षरी ॥
गाय नि कावळा । नावात वास करी ॥

उत्तर गोकाक

रचयित्री – मंगला द. मुंडले

या कोड्यांची जन्मकथा व वापरविषयक निवेदन वाचले नसल्यास या लेखाच्या सुरुवातीला वाचा.

Hits: 34

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *