Tit for tat
ही म्हण मुळात “tip for tap” अशी होती. पण म्हणायला सोपे जाते म्हणून “tit for tat” म्हणू लागले. Tip आणि tap या दोन्ही शब्दांचा अर्थ चापट मारणे असा आहे. “Tit for tat” चा सरळ अर्थ एकाने चापट मारली म्हणून चापट खाणार्याने मारणार्यालाही एक चापट दिली असा होतो. प्रत्यक्षात एकाने जे केले तसेच दुसर्याने करून त्याची परतफेड केली या अर्थाने ही म्हण वापरली जाते. मराठीत त्याच अर्थाने बर्याच म्हणी आहेत, जसे की – “जशास तसे”, “ठोशास ठोसा”, “शठं प्रति शाठ्यम्” किंवा “अरेला कारे”. या म्हणीच्या वापराचे हे एक उदाहरण – “When Ajay called him fat, Vijay called him rat. That was a tit for tat.”
लहान मुलांना ह्या म्हणीचा अर्थ सांगण्यासाठी वरील परिच्छेद पुरेसा आहे. थोड्या मोठ्या मुलांना पुढील मजकुराची जोड देता येईल.
इंग्रजीत tap या क्रियापदाला फक्त चापटी असा अर्थ असला तरी tip या क्रियापदाला केवळ चापटी नव्हे तर कलंडायला लावेल इतका धक्का असाही अर्थ आहे. एखाद्याने चापटी मारली (tap) तर उत्तर म्हणून कलंडावे लागेल इतका धक्का मिळणे (tip) त्यातून सूचित होते. थोडक्यात चापटीने सुरू झालेले प्रकरण “जशास तसे” एवढ्यापुरते मर्यादित न राहाता कलेकलेने वाढत जाण्याची शक्यता या म्हणीत व्यक्त होते.
या म्हणीवरचा तपशीलवार निबंध इथे पाहा.
Hits: 5
Recent Comments