कोडी – वस्तुनामे

रचयित्री – मंगला द. मुंडले

एक शब्द मी तीन अक्षरी । मला पाहुनी भुलती नारी ॥

पहिले दुसरे अक्षर घेता । एक प्राणि मी होई मोठ्ठा ॥

दुसरे आणि तिसरे घ्याल । अर्थ तयाचा “किंचित” होइल ॥

तिसरे आणिक पहिले घ्याल । तर लोभाच्या विरुद्ध जाल ॥

पहिले नंतर तिसरे घ्याल। रसाळ खाऊ तुम्हा मिळेल ॥

उत्तर गजरा

—————————————————

मी आहे एक वाहन । तीन अक्षरे माझी ॥

खेडेगावात माझ्याशिवाय । हलत नाही काही ॥

पहिले तिसरे घ्याल । तर “खोटे नाही” म्हणाल ॥

पहिले तिसरे दुसरे घेता । उभा असे मी सफाइकरिता ॥

उत्तर खटारा

————————————————–

चार अक्षरी मी । आहे एक वस्त्र ॥
माझ्या नावात एक कप । आणि दोन र ॥

उत्तर परकर

—————————————————

तीन अक्षरी मी तर फत्तर । देवाचे घर ते माझे घर ॥

पहिले दुसरे अक्षर घ्यावे । एक ते दहा मधि मला पहावे ॥

दुसरे तिसरे अक्षर घ्याल । मारायाची आज्ञा द्याल ॥

पहिले तिसरे अक्षर घ्यावे । या दिवशी आनंदी व्हावे ॥

उत्तर सहाण

रचयित्री – मंगला द. मुंडले

या कोड्यांची जन्मकथा व वापरविषयक निवेदन वाचले नसल्यास या लेखाच्या सुरुवातीला वाचा.

Hits: 25

You may also like...

2 Responses

  1. अर्चना देशपांडे says:

    बापरे ! एकेक कोड म्हणजे खाद्यच आहे.
    फणस,हलवा, आणिही बरीचशी कोडी खरंच विचार करायला लावतात.फारच सुंदर. आत्ता आई हयात असत्या , तर साष्टांग नमस्कार घालायला आले असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *